नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॅालेजरोड भागातील नामांकित रेस्टॉरंटमधील एका वरीष्ठ कर्मचा-याने आपल्या सहकारी तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. रेस्टॉरंटमध्ये नोकरीस असलेल्या या तरुणीला पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून हे कृत्य केले. याप्रकरणात पीडित तरुणीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मधुकर कदम (२९) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता आणि संशयित कॅालेजरोड भागातील नामांकित रेस्टॉरंट मध्ये नोकरीस आहेत. गेल्या बुधवारी पीडिता कामावर असताना संशयिताने तिला गाठून नोकरीत पदोन्नती मिळवून देण्याचे आमिष दाखवून हे कृत्य पंचवटीतील हॅाटेलमध्ये केले. या घटनेनंतर तीला जीवे मारण्याची धमकी देऊन तीला मारहाण केल्याने हा प्रकार पोलिस स्थानकात पोहचला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक येसेकर करीत आहेत.