नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कपीला गोदावरी संगम येथे महापालिकेच्या वतीने मलनिस्सारणासाठी लावण्यात आलेले जीआय पाईप,स्प्रिंकलर आणि व्हाल्व असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. जयवंत धोंडू पाटील (रा.प्रशांत नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपोवनातील मलनिस्सारण केंद्राचे पाटील काम पाहतात. बुधवारी (दि.१२) रात्री अज्ञात चोरट्यांनी कपीला गोदावरी संगम येथे लावण्यात आलेले जीआय पाईप,स्प्रिंकलर नेझल्स आणि व्हाल्व असा सुमारे १३ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.