नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीबीएस परिसरातील लॉजमध्ये मुक्कामी थांबलेल्या जळगाव येथील ५४ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनिल शिवाजी बखरकर (रा.विहीर नालेगाव ता.मेहुणबारे जि.जळगाव) असे लॉज मध्ये मुक्कामी थांबलेल्या मृत प्रवाशाचे नाव आहे. बखरकर बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बखरकर कामानिमित्त शहरात आले होते. सोमवार (दि.१०) पासून ते सीबीएस परिसरातील हॉटेल येथे ते मुक्कामी होते. गुरूवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास रूम नं. २१० चा दरवाजा उघडा दिसल्याने कर्मचा-यांनी डोकावून पाहिले असता ते बेशुध्द अवस्थेत मिळून आले होते. लॉज कर्मचा-यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत लॉजचे सचिन खैरनार (रा.पेठरोड) यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.