नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात २७ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना हिरावाडी रोडवरील त्रिमूर्तीनगर परिसरात मंगळवारी रात्री साडे दहा वाजता घडली. सचिन जोशी असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावरही आधी गंभीर गुन्हे दाखल आहे. गेल्या वर्षी त्रिमूर्तीनगर परिसरात दोन गटात झालेल्या वादातून व्यंकटेश शर्मा (२२) या तरुणाची हत्या झाली होती. या वादातूनच जोशी यांच्यावर हा धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह गुन्हा शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचवटी पोलिस ठाण्यात या हल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.