नदी पात्रातील पाण्यात बुडून ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू
नाशिक : गोदाघाटावरील दुतोंड्या मारूती जवळ नदी पात्रातील पाण्यात बुडून ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. जिवरक्षकांसह स्थानिकांनी त्यास तात्काळ पाण्याबाहेर काढले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोदाघाटावरील दुतोंड्या मारूती भागात शुक्रवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास ३५ वर्षीय तरूणाचा मृतदेह मिळून आला. सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून आंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा अंदाज बांधला जात आहे. तरूणाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने स्थानिकांसह जीवरक्षकांनी त्यास तात्काळ पाण्याबाहेर काढले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसन नाईक रोकडे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार शेळके तपास करीत आहेत.
आगरटाकळी परिसरात ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक : ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आगरटाकळी परिसरात घडली. समाधान शेषराव खैरे (रा. सार्व.सुलभ शौचालयाजवळ,समतानगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. खैरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खैरे यांनी शुक्रवारी (दि.७) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पत्र्याच्या अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
……….