नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७६ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना जेलरोड परिसरातील कॅनोलरोड भागात घडली. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम सुखदेव सोनवणे (रा.रूद्राक्ष रो हाऊस,चंपानगरी,कॅनोलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे कुटुंबिय शुक्रवारी (दि.१६) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे,चार हजार रूपयांची रोकड आणि मोबाईल असा सुमारे ७६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.