नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उड्डाणपूलावरून उडी घेतल्याने सिडकोतील तरूणाचा मृत्यू झाला. सतिश तात्याभाऊ अहिरे (३२ रा.त्रिमुर्तीचौक,पाटीलनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. अहिरे याने शनिवारी (दि.१७) रात्री अज्ञात कारणातून महामार्गावरील कन्नमवार पुलाच्या कठड्यावरून उडी घेतली होती. दोन्ही पुलांच्या मध्यभागी उडी घेतल्याने त्यास मोठी दुखापत झाली होती. डोक्यास, हातापायास आणि छातीस मार लागल्याने त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.