नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे भागात पाहूणी म्हणून आलेल्या महिलेचा एकाने घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विशाल कंक (रा.चुंचाळे,अंबड) असे महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता आपल्या बहिणीच्या घरी काही दिवसांसाठी पाहूणी म्हणून आलेली असून बुधवारी ती घरात एकटी असतांना ही घटना घडली. संशयित हा पीडितेच्या बहिणीचा परिचीत असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहे. बहिणीस हात उसणवार दिलेले पैसे मागण्याच्या बहाण्याने संशयिताने घरात प्रवेश करीत हे कृत्य केले. महिला एकटी असल्याची संधी साधत त्याने अंगलट करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार कैलास चव्हाण करीत आहेत.