नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड येथील ढिकलेमळा भागात घरात घुसून झोपलेल्या महिलेचा नातेवाईकाने विनयभंग केल्याची घटना घडली. महिलेने आरडाओरड करीत विरोध केल्याने संशयिताने शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे हा प्रकार पोलिसात पोहचला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगासह विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश मनोहर उतपुरे (रा.साईनाथनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकाच भागात राहत असून ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. मंगळवारी (दि.२१) रात्री पीडित महिला आपल्या राहत्या घरात लहान मुलास झोपवत असतांना मामेभाऊ असलेल्या संशयिताने बळजबरीने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने विनयभंग करीत पीडितेशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोंडे करीत आहेत.