नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उंटवाडी भागातील एका सोसायटीच्या आवारात झाडावरून पडल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. सुरेश निवृत्ती उघडे (रा.पिंप्री – मानेगाव ता.त्र्यंबकेश्वर) असे मृत युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उघडे बुधवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉल समोरील उषा किरण सोसायटी आवारातील उंच झाडांची छाटणी करीत असतांना ही घटना घडली. उंच झाडावरील फांदी तोडत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर पडला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने मामा काळू सोमा दोंगडे व मेहूणा काशिनाथ जगन खोडे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.