नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्यविक्री करणा-या दोघांवर पोलिसांनी कारवाई करत मद्यसाठ्यासह एकाची दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई संभाजी स्टेडिअम भागात करण्यात आली. राहूल संजय गामणे (२९ रा.दत्त मंदिरासमोर मोरवाडी) हा युवक संभाजी स्टेडिअम मागील मोकळया जागेत दारू विक्री करीत होता. त्याच्या एमएच १५ एफएल ४४९९ या अॅक्टीव्हाच्या डिक्कीत १८० मिलीच्या १० व ९० मिलीच्या ८ प्रिन्स संत्रा या देशी दारूच्या बाटल्यांचा साठा मिळून आल्या. या कारवाईत दुचाकीसह मद्यसाठा असा सुमारे ६५ हजार ९८० हजार रुपए किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत. दुसरी कारवाई कामटवाड्यात समता चौक भागात करण्यात आली. येथे दिपक माधव मगर (रा.आंबेडकर पुतळय़ाजवळ कामटवाडा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. संशयित समता चौक भागात प्लॅस्टीकच्या गोणीत प्रिन्स संत्रा नावाची देशी दारूची विक्री करीत होता. त्याच्या ताब्यातून सुमारे २ हजार १०० रुपये किमतीच्या १८० मिलीच्या ३० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी शिपाई मुकेश गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.