India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोबाईल बँकीगद्वारे लांबवले तब्बल ७ लाख; आडगाव परिसरात एकाची आत्महत्या

India Darpan by India Darpan
May 24, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँक खात्यातील तब्बल सात लाखाची रक्कम मोबाईल बँकीगचा वापर करून परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर अ‍ॅक्सेस मिळवित हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका इंडसइंड बँक ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ते १८ मार्च दरम्यान भामट्यांनी इंडसइंड बँक ग्राहकाच्या मोबाईल बँकीगचा वापर करून तसेच अ‍ॅक्सेस मिळवित खात्यातील सुमारे ६ लाख ९९ हजार रूपयांची रक्कम परस्पर अन्य चार खात्यांमध्ये वर्ग करून लांबविली आहे. याप्रकरणी पोलिस दप्तरी फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

आडगाव परिसरात एकाची आत्महत्या
महामार्गावरील वृंदावननगर भागात ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गणेश रामदास निकम (रा. जत्रा हॉटेल जवळ, वृंदावननगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. निकम यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निकम यांनी मंगळवारी (दि.२३) आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत मंगला शेलार यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.


Previous Post

IPL नॉकआऊट सामन्यांना आजपासून प्रारंभ… मुंबईची लखनऊशी लढत… हरेल तो जाईल थेट बाहेर…

Next Post

हिरावाडीत महिलेचे मंगळसूत्र लांबवले तर मन्नत लॉन्समध्ये जेवणाऱ्या महिलेची पर्स केली गायब

Next Post
प्रातिनिधिक फोटो

हिरावाडीत महिलेचे मंगळसूत्र लांबवले तर मन्नत लॉन्समध्ये जेवणाऱ्या महिलेची पर्स केली गायब

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group