India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हृदयद्रावक! ज्या मुलीचा नवस फेडण्यासाठी आली.. त्याच मुलीसह आई धरणात बुडाली… चांदवड तालुक्यातील दुर्घटना

India Darpan by India Darpan
April 15, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केंद्राई देवी मातेचा नवसपूर्ती करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील वडार समाजाचे नागरिक आले होते. यावेळी २२ वर्षीय महिला व तिची ७ महिन्याची चिमुकली केंद्राई धरणातील पाण्यात बुडून मृत झाल्याची घटना घडली. या घटनेची वडणेरभैरव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहू नगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवार रोजी चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केंद्राई माता मंदिरात नवसपूर्ती करण्यासाठी आले होते. यावेळी ज्या सात वर्षाच्या मुलीचा नवस होता ती ७ महिन्याची तन्वी निलेश देवकर व तिची आई अर्चना निलेश देवकर (२२) या दोघी माय लेकी केंद्राई धरणातील पाण्यात बुडून मयत झाल्या. या घटनेची माहिती मिळताच वडणेरभैरवचे सहा. पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी घटनास्थळी पोहचुन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

खडक ओझर येथs श्री केद्राई देवीचे मंदिर आहे. येथे नवसपूर्तीसाठी विविध ठिकाणाहून भाविक येत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने येथे येत असतात. देवकर मायलेकीसुद्धा त्यापैकीच एक होत्या. दर्शनानंतर मायलेकी धरणाजवळ गेल्या होत्या. यावेळी आई अर्चना देवकर हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. त्याचवेळी तिच्यासोबत मुलगीही होते. आणि दोघेही पाण्यात बुडाले. काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

⬜🟪⬜🟪⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*

तर मग

*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा👇https://t.co/hbtHdVcAG4

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023

🚨 *नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध हायकोर्टाने काढले वॉरंट*
https://t.co/GoE61vQ7n3#indiadarpanlive #nashik #zp #education #officer #warrant #mumbai #high #court

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 15, 2023

Nashik Chandwad Mother Daughter Drown in Dam


Previous Post

सेल्फीसाठी ब्रेट लीच्या कारमागे धावले दोन चाहते.. पुढं हे सगळं घडलं (व्हिडिओ)

Next Post

महाराष्ट्र भांडारच्या संस्थापिका व संचालिका सौ. वीणा सुधाकर पिसोळकर यांचे निधन

Next Post

महाराष्ट्र भांडारच्या संस्थापिका व संचालिका सौ. वीणा सुधाकर पिसोळकर यांचे निधन

ताज्या बातम्या

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group