नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरनाका येथे खासगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बसचा विदर्भाच्या वाशीम येथून बस निघतांनाचा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. एका प्रवाशांच्या नातेवाईकांनी हा बसचा हा फोटो काढला असल्याचे बोलले जात आहे.
पहाटे झालेल्या या अपघातात ३४ प्रवाशी जखमी झाले. मिरची हॅाटेलजवळ येथील चौफुलीवर पहाटे ५ वाजता ही घटना घडली आहे. ट्रेलर व बसमध्ये हा अपघात झाला. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना झाल्यानंतर अनेक प्रवाशी झोपेत होते. स्लिपर कोच असल्यामुळे अनेक प्रवाशांना उठण्यास वेळ लागला. काही प्रवाशी उतरले. यातील जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या गाडीत ४८ प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही गाडी चिंतामणी ट्रव्हल्सची असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाचे जवाना घटनास्थळी दाखल झाले. या आगीत बस जळून खाक झाली आहे.
Nashik Bus Fire Accident Vashim Photo Viral