नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-औरंगाबाद महामार्गावर कोटमगाव शिवारात स्पीड ब्रेकरमुळे दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताची अधिक माहिती अशी की, औरंगाबाद मधील बिडकीन येथे धार्मिक कार्यासाठी जात असलेल्या वाहनाचा देवीचे कोटमगाव येथे वळणावर असलेल्या स्पीडब्रेकरमुळे भीषण अपघात झाला. त्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. लक्ष्मी विजय प्रजापती राहणार लासलगाव, पूजा आहेर आणि मंदाबाई प्रभाकर गायकवाड, मालताबाई मधुकर बागुल तिघी राहणार मनमाड या चार महिला जखमी झाल्या असून यात मंदाबाई गायकवाड यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सदरचा अपघात हा स्पीड ब्रेकरमुळे झाला असून स्पीड ब्रेककरवर कोणत्याही प्रकारचे रंगाचे पट्टे नसल्यामुळे हा अपघात झाला असल्याची बोलले जात आहे.