नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात संमगनेर येथे कार्यरत असलेला ज्युनिअर इंजिनीअर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. संजय गोविंदराव ढवण असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून १९ हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी एसीबीकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
एसीबीने दिलेली माहिती अशी
यशस्वी सापळा – युनिट – नाशिक
– तक्रारदार- पुरुष,वय 26 वर्ष रा. संगमनेर
– आरोपी लोकसेवक- संजय गोविंदराव ढवण, वय- 57 वर्ष
पद -कनिष्ठ अभियंता वर्ग-3 नेमणूक -जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग, संगमनेर. (रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर)
– लाचेची मागणी- 19000/-रू.
– लाच स्विकारली- 19000/-रु.
– हस्तगत रक्कम- 19000/-रू.
– लाचेची मागणी – दि.04/05/2022
– लाच स्विकारली- दि.23/05/2022
– लाचेचे कारण – तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या ग्रामपंचायत चिंचोली तालुका संगमनेर येथील मुस्लिम स्मशानभूमी च्या वॉल कंपाऊंड चे सुशोभीकरणाचे कामाची पाहणी करून, एम बी करून देण्याच्या मोबदल्यात सदर कामाची रक्कम तीन लाख रुपये असून त्या रकमेच्या पाच टक्के प्रमाणे 15000/-रुपये तसेच क्वालिटी कंट्रोल चे 4000/-रुपये असे एकूण 19000/-रुपये लाचेची मागणी आरोपी लोकसेवक ढवन यांनी करून सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः पंचायत समिती कार्यालय येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कक्षात, संगमनेर येथे स्वीकारली म्हणून गुन्हा.
– हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
– तपास अधिकारी- मीरा आदमाने , पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक
– सापळा पथक- पो.ना. प्रवीण महाजन, पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रभाकर गवळी, चालक पो.हवा संतोष गांगुर्डे
मार्गदर्शक-
1) मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आलोसे यांचे सक्षम आधिकारी-
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक
@ दुरध्वनी क्रं. 0253-2575628
@ टोल फ्रि क्रं. 1064