India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कौतुकास्पद! नाशिकच्या चार महिला क्रिकेटपटूंची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

माया सोनवणे, ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व शाल्मली क्षत्रिय यांचे यश

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे, ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व शाल्मली क्षत्रिय या चौघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे गुवहाटी येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी या चौघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. माया सोनवणे , ईश्वरी सावकार व रसिका शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर शाल्मली क्षत्रिय ने यंदा १९ वर्षांखालील महिला संघाचे प्रतिनिधित्व केले.

माया सोनवणे ही उत्तम फिरकीपटू असून सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची लागोपाठ दोन हंगामात प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती व काही वर्षांपासून वरिष्ठ महिला संघाची सदस्य आहे. रसिका शिंदे जलदगती गोलंदाज व उत्कुष्ट फलंदाज असून शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. तर ईश्वरी सावकार ची यंदा १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धे नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे. व तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.

यापूर्वीच्या व यंदाच्या हंगामात वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेतील या खेळाडूंची सातत्यपूर्ण, लक्षणीय कामगिरी विचारात घेऊनच सदर निवड झाली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे मुली व महिला क्रिकेटपटूंसाठी साठी सराव शिबीर वर्षभर सुरू असते. त्यात सर्व खेळाडूंना उत्तम मार्गदर्शनाचा लाभ होत असतो.

गुवहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : १८ जानेवारी – हिमाचल प्रदेश, २१ जानेवारी – विदर्भ , २३ जानेवारी – हैद्राबाद ,२५ जानेवारी – गोवा , २७ जानेवारी – बिहार व २९ जानेवारी – उत्तराखंड .

या निवडीमुळे नाशिकच्या व खासकरून महिला क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, चौघींच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी खास अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Nashik 4 Women Cricketer Selected in Maharashtra Team


Previous Post

नाशिक पदवीधर निवडणुकीत या उमेदवारांनी घेतली माघार; आता एवढे उमेदवार रिंगणात

Next Post

ओझरमधील तरुणाच्या खुनाचा उलगडा; हे धक्कादायक कारण आले समोर

Next Post
प्रातिनिधिक फोटो

ओझरमधील तरुणाच्या खुनाचा उलगडा; हे धक्कादायक कारण आले समोर

ताज्या बातम्या

संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023

ही पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय; युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

February 1, 2023

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group