नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा लिलाव सुरू होत असल्याची घोषणा करत आनंद व्यक्त केला आहे. लिलावातून मिळणारी रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाते. मोदी यांनी नागरिकांना pmmmentos.gov.in वर स्मृतीचिन्हांसाठी बोली लावून लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले;
“दरवर्षी, सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान मला मिळणाऱ्या विविध स्मृतिचिन्हांचा मी लिलाव करतो. लिलावातून मिळणारी रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाते. मला हे सांगताना आनंद होत आहे की या वर्षीचा लिलाव सुरू झाला आहे. तुम्हाला आवडणाऱ्या स्मृतिचिन्हांसाठी बोली लावा!