India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरणः तडकाफडकी ६ पोलिसांच्या बदल्या

India Darpan by India Darpan
September 19, 2022
in राज्य
0

 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केल्याच्या आरोपाखाली पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धडगाव पोलीस निरीक्षकासह सहा जणांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

धडगाव तालुक्यातील खडक्या येथे १ ऑगस्ट रोजी एका महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. या महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. तरीदेखील पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केली होती. यानंतर न्यायाच्या मागणीसाठी वडिलांनी मृतदेह दीड महिना मीठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला. हे प्रकरण माध्यमांनी समोर आणल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवून कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुन्हा शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आणला. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल प्रलंबित आहे. अखेर दीड महिन्यानंतर कुटुंबीयांनी आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

पोलिसांकडून दिरंगाई
पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यानंतर धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांचा कार्यभार आय. एन. पठाण यांनी स्वीकारला आहे. तसेच उपनिरीक्षक बी. के. महाजन यांचीही नियंत्रण कक्षात आणि खडक्या, वावी क्षेत्र सांभाळणारे संजय मनोरे, किरण वळवी, उदेसिंग ठाकरे, योगेश निकम या पोलीस कर्मचाऱ्यांची इतर पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे.

दोषींवर कठोर कारवाई व्हावी!
मुंबईहून खडक्या येथे परतलेल्या पीडितेच्या वडिलांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केले असून दोषींना कठोर शिक्षा देऊन मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाच्या वेगवान तपासासाठी पोलीस महानिरीक्षकांनी नेमलेल्या विशेष तपास पथकाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली असून तपासाला वेग आला आहे.

Nandurbar Rape Murder Case 6 Police Transfer


Previous Post

संजय राऊत यांना दिलासा नाहीच; जेलमधील मुक्काम वाढला

Next Post

पुण्यातील मालमत्तेच्या किंमतींमध्ये वार्षिक एवढी वाढ; देशातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक

Next Post

पुण्यातील मालमत्तेच्या किंमतींमध्ये वार्षिक एवढी वाढ; देशातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group