मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेविका शोभाताई मोरे, नगरसेवक अर्जुन मराठे, नगरसेवक मिलिंद बाफना यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पनवेल येथे आज झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांसह या मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याचवेळी पलूस (जि. सांगली) येथील उद्योजक आणि सुमारे १०० काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रभारी खा.सी.टी.रवी, प्रदेश सरचिटणीस आ.श्रीकांत भारतीय, केंद्रीय प्रवक्त्या खा.डॉ.हीना गावित, माजी मंत्री आ.विजयकुमार गावित, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
Nandurbar District Shivsena Chief and Other Leaders BJP Entry