सोमनाथ घोंगाणे
नांदगाव – मकरसंक्रातीच्या सणाच्या दिवशी देशाच्या बिहार मधील वीरपुर सिमेवर कार्यरत असतानां बोलठाण येथील जवान अमोल पाटील यास उच्च दाबाच्या वीजेचा धक्का लागुन वीरमरण आले होते. त्यांचे पार्थीव औरंगाबाद येथे हवाई दलाच्या विमानाने आणले होते. तेथून आज त्याच्या मुळगावी बोलठाण येथे आणण्यात आले. यावेळी बोलठाण शहर व परिसरात नागरिकांनी रस्त्याच्या दुर्तफा परिसर स्वच्छ करून सडा व रांगोळी काढण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी आंदराजंलीचे बॅनर लावण्यात आले होते. शहीद जवान अमोल पाटील यांच्या घरी पार्थीव ठेवण्यात आले. त्याठिकाणी त्यांची आई, भाऊ, पत्नी, नऊ महिन्याची कन्या आदीती यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी कुटूंबातील सदस्यानी एकच आक्रोश केला. कुटूंबियाच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.त्यानंतर सजवलेल्या वाहनामधून बोलठाण गावातून देशभक्तीपर गीतात अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी अंत्ययात्रे मध्ये आजी, माजी सैनीक, एन. सी. सी. चे विद्यार्थी तरूणासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते .बोलठाण परिसरात अभुतपुर्ण जनसमुदायाचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आले होते. सशस्त्र सीमा दलाचे अधिकारी , जवान, पोलीस अधिकारी माजी सैनीक संघटना आदीनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली विविध राजकीय सामाजीक संघटना, पक्ष, संस्था आदीनी आदराजंली वाहीली. शहीद जवान अमोल यांचा लहान भाऊ रोषण पाटील याने पार्थीवाला मुखाग्नी दिला. यावेळी वीर जवान अमर रहे, अमोल पाटील अमर रहे भारतमाता की जय अशा घोषणानी परिसर दुमदुमूण गेला. भारतीय सशस्त्र सीमा दल, महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहिद अमोल पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी वीर पत्नी हिस बहीण मानूण वीरकन्या हिस भाची मानून भावाकडून जबाबदारी म्हणून पाच लाखाची मदत जाहीर केली. तसेच शासकीय योजनेच्या पुर्ततेसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या योजना मी स्वतः घरी येवून पुर्ण करेल असे वचन दिले. तसेच शहीद अमोल दादा यांचे भव्य स्मारक बोलठाण येथे उभारण्याचे स्पष्ट केले. अमोल दादाचे बलिदान कधीही विसरू शकत नाही आम्हाला अमोल दादा आणी त्याच्या परिवाराचा सदैव अभिमान राहील. एक मुलासारखा मी आपल्या परिवारासोबत कायम राहीन असा शब्द दिला.
यावेळी वैजापुर येथील आमदार रमेश बोरणारे , माजी आ. अनिल आहेर, माजी आ. संजय पवार, प्रांतअधिकारी सोपान कासार नायब तहसिलदार मरकड, पंचायत समिती सभापती सुभाष कुटे, नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी जि. प. सदस्य राजेद्र पवार ग्रामपंचायत सदस्य अनील तात्या रिढें आदीनी पुष्पचक्र वाहून आदराजंली वाहीली.