अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी शरद जोशी प्रणित रयतक्रांती व महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संघटने तर्फे नामपूर (ता. सटाणा) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हयात उन्हाळी कांद्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यामुळे कांद्याचे दर ५०० ते ९०० रुपये इतके खाली आल्याने कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये संताप आहे.
लागवडीच्या वेळी मजूरांची टंचाई, लागवडीसाठी करावा लागलेला मोठा खर्च, त्यातच खत, डिझेल यांचे वाढलेले दर त्यामुळे कांद्याच्या लागवडीचा खर्च सध्याच्या दरातून मिळत नसल्याने शेतक-यांची अवस्था बिकट झाली आहे.कांदा निर्यातमूल्य निर्यातशूल्क शून्य टक्के करावे, कांद्याला गुजरात प्रमाणे केंद्राने व राज्य सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे, कांद्याचे किरकोळ तसेच होलसेल व्यापा-यांसाठी साठा मर्यादा केंद्र सरकारने कायमची उठवावी तर आखाती देशात कांद्याला मागणी असून ही कंटेनरच्या दरवाढीमुळे कांदा निर्यातदार ते लवकर मिळत नाही. तसेच ते परवडत नाही. त्यासाठी केंद्र सरकारन निर्यात अनुदान योग्य प्रकारे दिल्यास निर्यातदारांना दिलासा मिळून पर्यायाने शेतक-यांना चांगला दर मिळेल या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्हयातील नामपूर येथील बाजार समिती समोर हे रास्ता राको आंदोलन करण्यात आले.