India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नागपूर शहर परिसरातील रस्ते आणि विविध ठिकाणे पुढच्या दोन महिन्यात होणार चकाचक; हे आहे कारण

India Darpan by India Darpan
December 25, 2022
in राज्य
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरातील प्रमुख रस्ते आणि विविध ठिकाणांचे भाग्य उजळणार आहे.निमित्त आहे ते जी२० परिषदेचे. या परिषदेसाठी येत्या दि. २१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगीरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, महानगरपालिका,सुधारप्रन्यास व जिल्हा प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पूर्वतयारीचा आढावा सादर केला. विमानतळ ते प्रमुख महामार्गांचा कायापालट या काळात केला जाईल. मुंबईप्रमाणेच नागपूर येथे तयारी सुरु झाली असून प्रमुख रस्ते, बैठकीची स्थळे, ज्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत त्या त्या ठिकाणी प्राधान्याने सजावट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगती पथावर असणारी कामे, प्रस्तावित कामे मार्चपूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करा. ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा तलाव अशा प्रेक्षणीय ठिकाणी पोहोचणाऱ्या रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा. मुंबई प्रमाणे उत्तम व दर्जेदार सुशोभीकरण करण्यात यावे. देशाच्या यजमान पदाला साजेशी उत्तम दर्जाची कामे करावी. स्थानिक कला, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या इमारती यांची भव्यता व आकर्षकता प्रतिबिंबीत झाली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

या बैठकीला उपस्थित प्रधान सचिव दीपक कपूर यांनीही मिहान व अन्य महत्वाच्या प्रकल्पांची माहिती बैठकांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे सादर व्हावी, अशा सूचना केल्या. या निमित्ताने दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे.आयोजनाची प्रसिद्धीही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

Nagpur City Roads and Various Places Development
G20 Summit Conference Meetings


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तेव्हा जिवंत असल्याची जाणीव होते

Next Post

समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार या शहरापर्यंत

Next Post

समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार या शहरापर्यंत

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group