..
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सरचिटणीस निधीची घोषणा केली होती. त्यांच्या प्रतिसादाला साथ देत समाजातील शिक्षणाचे महत्त्व डोळ्यासमोर ठेवत स्वतः शिक्षकी पेशात असणाऱ्या जामदार व जगताप कुटुंबीय यांनी संस्थेला आर्थिक मदत केली. सदर निधीची भर पडल्याने शैक्षणिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना या निधीचा उपयोग होणार आहे. मविप्र संस्थेच्या सेवक सोसायटीमध्ये कार्यरत असणारे शिवाजी महादू जामदार यांनी आपले चिरंजीव विशाल याचा विवाह साधेपणाने करीत ५१ हजार रुपये रकमेचा धनादेश लग्न सोहळ्याप्रसंगी मविप्र संस्थेला दिला. यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी प्रा.अशोक पिंगळे,जामदार कुटुंबीय व जगताप कुटुंबीय उपस्थित होते. जामदार यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन ॲड नितीन ठाकरे यांनी यावेळी केले.