नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्भया पथक स्थापन करण्यात आले. नुकतेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलिसांनी निर्भया पथक सुरू केले. २६ जानेवारी रोजी मुंबईत निर्भया पथकाचा उद्घाटन सोहळा अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निर्भया पथकाचे गीत तयार करण्याचे भाग्य आपल्या नाशिकच्या कलाकारांना मिळाले.
या गीतासाठी मुख्य समन्वयक म्हणून राहुल रायकर, दिग्दर्शक जयेश आपटे, गीत तन्वी अमित, संगीत अमित पाध्ये, संकलक आदित्य रहाणे, ध्वनी संयोजन शुभम जोशी, रंग आणि वेशभूषा अपूर्वा शौचे, गायन रसिका नातू, शिवानी जोशी, मृदुला कुलकर्णी, पल्लवी दांडेकर, सुरभी गौड, गौरी पाठक, कॅमेरा निखिल पंडित, पियुष भानोसे आणि सनी देशमुख यांनी काम पाहिले. सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी, मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे तसेच कला आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याच निर्भया गीताविषयी समन्वयक राहुल रायकर आणि दिग्दर्शक जयेश आपटे यांच्याशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज दि. ०७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता आपण गप्पा मारणार आहोत. ही मुलाखत पाहण्यासाठी https://fb.me/e/1jMs7HqAJ या लिंकवर क्लिक करावे.
असे आहे गीत