नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- नाशिक महामार्गावर माणिकखांब जवळ मोटर सायकल अपघातात पती गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू झाला. आज दुपारी साडेचार वाजता हा अपघात झाला.
या अपघातात पत्नी वनिता सोपान राव (२३) रा. मुकणे यांचा मृत्यू झाला आहे तर पती सोपान किसन राव (२६) हे गंभीर जखमी झाले आहेत. राव दाम्पत्य हे मुंबईकडून नाशिककडे येत होते. त्याचवेळी माणिकखांब जवळ त्यांच्या मोटरसायकलला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघाताच पती गंभीर जखमी तर पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली. या रुग्णवाहिकेतून रुग्णांना घोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.
Mumbai Nashik Highway Accident Wife Death