India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तीन अपत्ये आहेत म्हणून काय झाले? निवडणूक लढता येणार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

India Darpan by India Darpan
February 12, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीन अपत्ये असणारा उमेदवारही निवडणुकीसाठी पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र व्हिलेज पंचायत अॅक्टच्या संदर्भात आज दिला आहे. या निकालामुळे आगामी निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला आहे.

याचिकाकर्ता महिला जानेवरी २०२१ च्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. पण, गावातील एका सदस्याने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने महिलेची निवड रद्द केली. तक्रारदाराचे म्हणणे होते की, कट ऑफ डेट ९ सप्टेंबर २००१ होती. महिलेला जो तिसरे मुलं झाले. ते या तारखेनंतर जन्माला आल्याने ती निवडणूक लढविण्यास पात्र नाही.

याचिकाकर्ता महिलेचे वकिल म्हणाले की, तिसऱ्या मुलाचा जन्म १२ फेब्रुवारी २००२ ला झाला होता. परंतु, मॅच्युर नसल्याने २ एप्रिल २००२ ला त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, कट ऑफ डेटनंतर जन्माला आलेले मुल किंवा नॉमिनेशन दाखल करण्यापूर्वी तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला तर त्या उमेदवारांच्या पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही. असा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतो, त्याच्या उमेदवारीवर कोणताही व्यक्ती प्रश्न उपस्थित करू शकत नाही.

काय म्हणाले न्यायालय?
प्रशासनाने एका महिलेला तीन अपत्यांमुळे अपात्र केले होते. त्या महिलेने कट ऑफ डेटनंतर तिसऱ्या मुलाला जन्म दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. पेडणेकर यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मुल जन्माला आले होते. पण नामांकन भरण्याच्या तारखेपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे.

Mumbai High Court on Third Child Election Candidature


Previous Post

राज्यातील सत्ताकारण कसं बदललं? सुप्रीम कोर्टापाठोपाठ या सुनावणीत होणार उघड

Next Post

१० सभा… १०,८०० किमी प्रवास.. ९० तासांचा कार्यक्रम…. पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा झंझावात

Next Post

१० सभा... १०,८०० किमी प्रवास.. ९० तासांचा कार्यक्रम.... पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा झंझावात

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group