India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या मार्गावर धावणार नाही लालपरी; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

India Darpan by India Darpan
January 5, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी म्हणजे महाराष्ट्राच्या लालपरीची एखाद्या मार्गावरील एक फेरी कमी झाली तरी कित्येकांचा हिरमोड होतो. अश्यात एखाद्या मार्गावरून यापुढे लालपरी धावणारच नाही, असे सांगण्यात आले तर काय होईल. प्रशासनाने सध्या एका मार्गाच्या बाबतीत असाच निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर यापुढे लालपरी धावणार नाही, असा निर्णय घेतला आहे. मुळात या मार्गावर अनेक खासगी वाहने धावतात. पण लालपरी ही सर्वसामान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत सोयीची मानली जाते. त्यामुळे या मार्गावर एसटीच्या फेऱ्या बंद होणार म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचाच प्रयत्न आहे. मुळात साध्या बसेस या मार्गाने सोडणे एसटीसाठी खर्चिक ठरत आहे. त्यामुळे यापुढे राज्य परिवहन महामंडळाची फक्त शिवनेरीच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून धावताना दिसणार आहे. प्रवाशांची संख्या आणि टोलचे भाडे यात मोठी तफावत आहे. या मार्गावर जवळपास सातशे रुपये टोल भरावा लागतो.

कधीकधी बसमध्ये प्रवासी कमी आणि टोलचे भाडे जास्त अशी परिस्थिती असायची. त्यामुळे महामंडळाला लालपरीच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उलट मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ४८५ रुपये टोलभाडे द्यावे लागते आणि या मार्गावर प्रवाशांची संख्याही जास्त असते. शिवाय मध्ये लागणाऱ्या छोट्या गावांमधील प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या मार्गावर टोलभाडे एसटीला भार वाटत नाही.

कारवाईचा इशारा
खरं तर साध्या एसटी एक्स्प्रेस-वेवरून न सोडता, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून सोडाव्या, असे निर्देश प्रशासनाने दिलेले होते. तसे झाले तर चालकाकडून दंड वसूल करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला होता. बऱ्याच अंशी जुन्या मार्गावरून लालपरीचा प्रवास सुरू झाला होता. पण काही चालकांनी मनमानी केल्यामुळे कठोर निर्णय घेणे प्रशासनाला भाग पाडले.

MSRTC ST Bus Big Decision Red Bus Will Not Travel
Mumbai Pune Express Highway


Previous Post

दिल्लीपासून गल्लीपर्यंत जैन समाज रस्त्यावर; पण का? असं अचानक काय घडलं?

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या फ्लॉवर शोचे केले कौतुक; पण का? (व्हिडिओ)

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या फ्लॉवर शोचे केले कौतुक; पण का? (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group