इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिवसेंदिवस विविध प्रकारचे सायबर गुन्हे वाढत आहेत. त्यातही या गुन्ह्यात वापरले जाणारे नवनवीन फंडेही समोर येत आहेत. आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी किरण कबाडी यांनी या सर्व गुन्ह्याची माहिती दिली आहे. एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने त्याचा मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याच क्षणाला त्यांच्या बँक खात्यातून १६ लाख रुपये लंपास झाले आहेत. हा प्रकार नक्की कसा आणि का घडला याची सविस्तर माहिती पोलिस अधिकारी कबाडी यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटद्वारे दिली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी किरण कबाडी यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिलेली माहिती अशी
Next level hacking – फक्त 2 दिवसात हैद्राबाद मधली एक अतिशय सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह केली आहे
एका मोठ्या कंपनीचा CEO माझ्या मित्राचा boss आहे त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये ऑनलाईन चोरी झाले कुठलाच OTP Call नव्हता , कुठली ही ऑनलाईन लिंक पाठवली गेली नाही किंवा ओपन केली गेली नाही त्याचा boss स्वतः अतिशय टेक्नो फ्रेंडली आहे पण कुठूनच मार्ग कळत नव्हता की इतकी अमाऊंट उडवली कशी सायबर क्राईमचें एलीट ऑफिसर्स केसवर होते पण समजत नव्हत….
मोबाईल मधुन सगळी स्कॅनिंग स्क्रूटणी झाली कुठलाच ट्रेस मिळाला नाही तेव्हा फक्त एक क्लू मला मिळाला
त्याच्या ऑफिसमधला CCTV फुटेजवरून तिथं क्लू मिळाला तर त्या CEO चा मोबाईलचा चार्जर हा बदलला गेला ऑफिसमधेच आणी त्याच्या ठिकाणी दुसरा USB चार्जर ठेऊन त्याचा सगळा डेटा हा कॉपी केला गेला.
त्याची अख्खी मोबाईल बँकिंग हॅक केली गेली आणी अकाउंट मधुन पैसे काढले गेले तर ह्या modus oprendy मध्ये आधी चार्जर रिप्लेस केला जातो व त्या चार्जर मध्ये एक आधीच एक मायक्रो चिप बसवलेली असते त्यात सगळा डेटा कॉपी केला जातो आणी hacking होते आणी हा अतिशय न समजून येणारा प्रकार आहे आणी माझ्या नॉलेज मध्ये हा पहिलाच प्रकार आहे hacking मधला.
त्यामुळे इथून पुढे चार्जर्स आणी USB कॉड वर विशेष लक्ष ठेवा कोणाचे ही वापरू नका किंवा आपला मोबाईल unknown ठिकाणी charging ला लावू नका.
Mobile Charging Cyber Crime 16 Lakh Theft
Mobile Hacking Smart Phone USB Cord