मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आज सज्जड दम दिला आहे. भोंग्यांच्या वादामुळे राज आणि सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या चर्चेत आहेत. त्यातच राज हे अयोध्या दौरा करणार असल्याने त्याविषयीही अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने राज यांना आव्हान दिले आहे, राज यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवरही राज यांचा दौरा चर्चिला जात आहे.
या सर्व परिस्थितीची दखल घेत राज यांनी आज एक फर्मान काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी, माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहे. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करु नये. तसेच, इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गाभिर्याने घ्यावे, जय महाराष्ट्र.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी
आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/Yf7spS4ccn— Raj Thackeray (@RajThackeray) May 7, 2022