बरेली (उत्तर प्रदेश) – ‘मुले म्हणजे देवाघरची फुले ‘ असे म्हटले जाते, साधारणतः पाच ते दहा वर्ष हे मुलांचे हे खेळण्या-बागडण्याच्या वय असते. अभ्यास करावा, टीव्ही पहावा आणि मैदानावर खेळायला जावे असा त्यांचा नित्यक्रम असतो. त्यातील काही मुले छंद जोपासतात. परंतु आठ दहा वर्ष वयाच्या मुलांनी फिल्मी स्टाइलमध्ये स्कूटी चोरली तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल. दोन मुलांनी स्कूटी चोरली अन् त्यावर खूप फिरत राहीले. मात्र त्याचे पेट्रोल संपल्याने त्याने त्याला पार्क करून तिथून दुसरी स्कूटी चोरली. स्कूटी चोरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हा प्रकार उघडकीस आला.
बरेलीच्या बारादरी परिसरातून एक स्कूटी चोरीला गेली. ती स्कूटी फोर्टच्या पंजाबपुरा येथे उभी असलेली आढळली. किल्ल्यातील पंजाबपुरा येथून आणखी एक स्कूटी चोरीला गेली. पंजाबपुरा येथेच ती काही अंतरावर उभी असल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मुले स्कूटी चोरताना दिसत आहेत.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांची ओळख पटवली. दोन्ही मुले बारादरी चौकी कंकरटोला येथील लोधी टोला परिसरात राहतात. या दोन्ही मुलांनी जगतपुरा इमामबारा येथून स्कूटी चोरली होती. त्याचे पेट्रोल संपल्याने त्याने स्कूटी किल्ला परिसरात उभी केली. तिथून दुसरी स्कूटी चोरीला गेली. स्कूटर चालवा थोडे अंतर चालल्यावर तिचेही पेट्रोलही संपले. तेव्हा ती स्कूटीही पंजाबपुरा परिसरात सोडली.
अटक करण्यात आलेल्या मुलांपैकी एक १० वर्षांचा तर दुसरा ८ वर्षांचा आहे. मात्र या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला नसून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. कारण कायद्याच्या तरतुदीनुसार इतक्या लहान वयाच्या मुलांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. दोघांनाही त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच पालकांना त्या मुलांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापुर्वी मुलांचे बराच वेळ समुपदेशनही करण्यात आले.