India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘त्या’ सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा मंत्री शंभूराजे यांचे आदेश

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in राज्य
0

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा ठाणे जिल्ह्यातील शासकीय कामांवर परिणाम होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास अडथळा आणणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. तसेच जिल्हा नियोजनाचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. देसाई यांनी यावेळी केली.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ खर्चाचा आढावा तसेच राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या अनुषंगाने आरोग्य सुविधा व अत्यावश्यक सुविधावर झालेला परिणाम यासंदर्भात आज श्री. शंभूराज देसाई यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीस जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा जिल्हयाचा संक्षिप्त आढावा सादर केला.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्याच्या संप कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे बाह्ययंत्रणेव्दारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवण्यात यावी. रुग्णालयातील बाहय रुग्णच्या तपासणीवर परिणाम होणार नाही व नागरिकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घ्यावी. एनआरएचएचे कर्मचारी संपात सहभागी असल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्याच्या जागी बाहय यंत्रणेव्दारे कर्मचारी नियुक्ती करण्यात यावेत.

तसेच जे कर्मचारी संपात सहभागी नाहीत व कार्यालयात रुग्णालयात उपस्थित असतात परंतु कर्मचारी संघटनातील कर्मचारी त्यांना कामावर येण्यास अडथळा निर्माण करत असतील, तर अशा अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुध्द संबंधित विभागप्रमुखानी
तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा / रुग्णालये सुरळीत सुरु राहण्यासाठी फिरते दौरे करावेत. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी सनियंत्रण करावे, अश्या सूचनाही पालकमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनांचा निधी १०० टक्के खर्च करा : पालकमंत्री
जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण, विशेष घटक व अनुसूचित जमाती उपयोजनेच्या खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चाच्या टक्केवारीवर समाधान व्यक्त करून पालकमंत्र्यांनी ३१ मार्च अखेर खर्चाचे प्रमाण १०० टक्के होईल याची काळजी घेण्याची सूचना प्रशासनास केली. तसेच आलेल्या निधीचा योग्य नियोजन करून कोणताही निधी अखर्चिक राहणार नाही, याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. ज्या योजनेत खर्च होत नसेल त्या योजनेचा निधी पुनर्विनियोजनाव्दारे इतर योजनेला देण्यात यावा, असे निर्देशही यावेळी दिले.

साकव योजनेचा खर्च न होणारा निधी जिल्हा परिषद रस्त्यासाठी पुनर्विनियोजन करण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) ७८ टक्के, अदिवासी उपयोजना ८० टक्के व विशेष घटक योजना ९७ टक्के खर्च झाला असल्याने उर्वरित निधी खर्च करण्याबाबत संबंधितानी कार्यवाही करण्याची सूचना यावेळी केली.
तसेच जे विभाग निधी खर्च करणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केली.

Minister Shambhuraje Order Action on Government Employee


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – सारे एकाच ध्येयाच्या दिशेने

Next Post

देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्स्पो’ची शिर्डीत जय्यत तयारी; ४६ एकर जागेतील एक्स्पोला १० लाख पशुप्रेमी देणार भेट

Next Post

देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्स्पो’ची शिर्डीत जय्यत तयारी; ४६ एकर जागेतील एक्स्पोला १० लाख पशुप्रेमी देणार भेट

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group