मुंबई – आपल्या भारतात ‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू’ तयार करण्याचा फंडा किंवा जुगाड गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. परंतु परदेशात देखील एखाद्या जुन्या वस्तूपासून दुसरी नवी वस्तू तयार करण्याचे वेड काही नागरिकांना असते, यामध्ये अगदी तंत्रज्ञ देखील मागे नसतात. त्यामुळे विमानाच्या टायरपासून चपला तयार करणे असो की एखाद्या मोठ्या जहाजाच्या लोखंडी धातूपासून मोटरसायकल तयार करणे असो, अशा गोष्टी आपण अनेकदा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. परंतु जगातील अत्यंत महागड्या कारपासून मोबाईल तयार करण्याची कल्पना अत्यंत आगळी-वेगळी आणि आश्चर्यकारकच म्हणावी लागेल.
वास्तविक हिऱ्यांनी जडलेला स्मार्टफोन कदाचित आपण पाहिला असेल, पण कारच्या बॉडीने बनलेला फोन आपण कधी पाहिला किंवा ऐकला आहे का? कदाचित नाही, पण कॅविअर या रशियन कंपनीने हा आगळावेगळा विक्रम केला आहे. कॅविअर त्याच्या प्रीमियम उत्पादनांसाठी जगप्रसिद्ध आहे आणि आता या कंपनीने कार वितळवून फोन बनवला आहे, विशेष म्हणजे ती कार काही साधीसुधी नाही, तर जगातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार टेस्ला मॉडेल 3 वितळवून तयार केली गेली आहे.
सध्या कॅविअर कंपनीने काही मनोरंजक नवीन उत्पादने जारी केली आहेत. आता टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्या सहकार्याने नवीन हाय-एंड कस्टम अॅपल आयफोन 13 प्रो सीरीज लॉन्च केली आहे. या वस्तू एकमेकांपासून अगदी वेगळ्या आहेत, परंतु त्यांच्यात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे दोघांचे शरीर वितळलेल्या टेस्ला कारपासून बनवले गेले आहे.
कस्टम आयफोन्स बद्दल बोलतांना रशियन लक्झरी वस्तू निर्मात्याने सांगितले की, नवीन iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max Electro ची आम्ही निर्मिती केली आहे. नवीनतम iPhone 13 हँडसेट हा कंपनीच्या iPhone 13 Pro मॉडेल्सच्या पोर्टफोलिओमध्ये सामील होत असून त्यात सोन्याचा मुलामा असून त्यात डायनासोरचा दात आहे.
तथापि, या प्रकाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची फ्रेम ब्लॅक पीव्हीडी कोटिंगसह टायटॅनियमची बनलेली आहे.
याशिवाय हे साहित्य टेस्ला कारच्या बॉडीपासून बनवले आहे आणि त्यावर एलोन मस्क, टेस्ला लोगो आणि कार देखील कोरलेली आहे. सदर कंपनी फक्त 99 टेस्ला इलेक्ट्रो मॉडेल्स बनवत आहे, ज्याची मूळ किंमत 6,760 अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे 5 लाख रुपये आहे.
या उत्पादनासोबतच, कॅविअरने एलोन मस्क बस्ट लाँच केला आहे, त्यात काळ्या संगमरवरी बेससह दुहेरी सोन्याचा प्लेटेड प्लाग आहे, यामध्ये बस्टचा अनुक्रमांक आहे, कारण त्याची फक्त 27 युनिट्स बनवली जातील. भारतात या iPhone 13 Pro ची सुरुवातीची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये आहे आणि iPhone 13 Pro Max ची प्रारंभिक किंमत सुमारे 1.20 लाख रुपये आहे.
हे टेस्ला मॉडेल 3 मधील धातूच्या भागांपासून एक छोटा पुतळा देखील बनलेला आहे. तसेच इलोन मस्कचा हा छोटा पुतळा खरेदी करण्यासाठी इच्छुक खरेदीदाराला 3,220 अमेरिकन डॉलर म्हणजे 2.40 लाख रुपये खर्च करावे लागतील.