India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा ट्रेलर आला; तुम्ही पाहिला का?

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. याच झगमगत्या दुनियेचा भाग होण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. त्यातील काहीजणांनाच यात यश मिळतं. या दुनियेबद्दल अनेक वाईट गोष्टी जरी नेहेमी कानावर पडत असल्या तरी याचं आकर्षण एवढा जबरदस्त आहे की, तरुण – तरुणी इथे येण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाहीत. अशाच एका ध्येयवेड्या तरुणाची कथा सांगणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

या विषयावर प्रकाश टाकणारा ‘सातारचा सलमान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात’, अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा ३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतो आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो घेत असलेली मेहनत, सामान्य मुलगा ते अभिनेता बनण्यापर्यंतचा त्याचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या जवळच्यांनी केलेली मदत या विषयावर हा चित्रपट बेतलेला आहे. ट्रेलरमध्येही याची झलक दिसते. आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर त्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणी त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेली परिस्थिती त्याला खरंच हिरो बनवणार का, याचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षकांना ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट पहावा लागणार आहे.

‘झिम्मा’ फेम हेमंत ढोमे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यामुळे एक चांगली कलाकृती बघायला मिळेल, असा प्रेक्षकांना विश्वास आहे. तर चित्रपटात, सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत हे देखील पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.

उभा चित्रपटाबद्दल माहिती देताना हेमंत ढोमे म्हणतो, प्रत्येक जण आयुष्यात मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो. या प्रवासात प्रत्येकाच्याच वाटेवर अनेक अडचणी येतात. कधीकधी आता सगळं संपलं, अशीही भावना निर्माण होते. मात्र वाईट काळातही आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूप गरजेचं आहे. आपण नेहमीच चांगल्या मानाने आपलं काम करत राहायला हवं, त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, असा संदेश देणारा हा सिनेमा आहे. एक धमाल, निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा सिनेमा जवळचा वाटेल, यात शंका नाही, असेही हेमंत ढोमे सांगतो.

Marathi Movie Satarcha Salman Trailer Out


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

गायींच्या मृत्यूमुळे चर्चा होत असलेल्या कणेरी मठाविषयी घ्या जाणून सविस्तर…

Next Post

गायींच्या मृत्यूमुळे चर्चा होत असलेल्या कणेरी मठाविषयी घ्या जाणून सविस्तर...

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group