बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित….हे पुरस्कारही जाहीर

by India Darpan
ऑगस्ट 14, 2024 | 8:23 pm
in राज्य
0
sudhir mungantiwar 1140x570 1 e1708969222301

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अठ्ठावनाव्या आणि एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

2020 वर्षासाठीचा 58 वा तसेच 2021 वर्षासाठीचा 59 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार आहे. सन 2020 या वर्षाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरिता जून,जयंती, फनरल या तीन चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.

उत्कृष्ट कला दिग्दर्शन अशोक लोकरे, ए.ऋचा ( मी वसंतराव), उत्कृष्ट छायालेखन अभिमन्यू डांगे ( मी वसंतराव ),उत्कृष्ट संकलन मनीष शिर्के (गोष्ट एका पैठणीची), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण राशी बुट्टे ( बिटरस्वीट कडूगोड ), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अनमोल भावे (मी वसंतराव),उत्कृष्ट वेशभूषा सचीन लोवाळेकर ( मी वसंतराव ), उत्कृष्ट रंगभूषा सौरभ कापडे ( मी वसंतराव ), उत्कृष्ट बाल कलाकार अनिश गोसावी ( टकटक ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

58 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 28 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.
सन 2021 च्या 59 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन झाली आहेत. याचबरोबर प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन be positive, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम,कुलूप या तीन चित्रपटांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

2021 साठी उत्कृष्ट कला दिग्दर्शन भूषण राऊळ, राकेश कदम (पांडू ), उत्कृष्ट छायालेखन रणजित माने (पोटरा), उत्कृष्ट संकलन परेश मांजरेकर (लक डाऊन be positive), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण अनिल निकम (बेभान), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अतुल देशपांडे (बाई पण भारी देवा), उत्कृष्ट वेशभूषा शफक खान, रोहित मोरे, निलेश घुमरे ( येरे येरे पावसा), उत्कृष्ट रंगभूषा पूजा विश्वकर्मा (हलगट), उत्कृष्ट बालकलाकार आर्यन मेगंजी ( बाल भारती ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 50 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 59 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी प्राप्त झाल्या होत्या.

58 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत.-
सर्वोत्कृष्ट कथा :- विठ्ठल काळे (बापल्योक), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ), रमेश दिघे ( फनरल उत्कृष्ट पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक ),गजेंद्र अहिरे( गोदाकाठ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट संवाद :- रमेश दिघे (फनरल), मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक), वैभव जोशी ( मी वसंतराव ), गजेंद्र अहिरे ( गोदाकाठ)

उत्कृष्ट संगीत: – विजय गवंडे ( बापल्योक ), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), रोहित नागभिडे ( फिरस्त्या )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- सारंग कुळकर्णी, सौरभ भालेराव ( मी वसंतराव ), विजय गवंडे ( बापल्योक ), अद्वैत नेमळेकर (फनरल),

उत्कृष्ट पार्श्वगायक:- अजय गोगावले (बापल्योक), आदर्श शिंदे (फिरस्त्या), राहूल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट पार्श्वगायिका:- आनंदी जोशी (काळी माती), सावनी रवींद्र (जीवनाचा गोंधळ), प्राची रेगे (गोदाकाठ)

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- शर्वरी जेमनीस ( मी वसंतराव ), सुजितकुमार ( गोष्ट एका पैठणीची), सुजितकुमार (चोरीचा मामला ),

उत्कृष्ट अभिनेता:- आरोह वेलणकर (फनरल), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), सिद्धार्थ मेनन (जून )

उत्कृष्ट अभिनेत्री :- सायली संजीव ( गोष्ट एका पैठणीची ), अक्षया गुरव ( बीटर स्वीट कडुगोड ), मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी (चोरीचा मामला), हेमंत ढोमे (चोरीचा मामला)

सहाय्यक अभिनेता :- नितीन भजन (सुमी), विठ्ठल काळे (बापल्योक), पुष्कराज चिरपुटकर (मी वसंतराव)

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे (फनरल), नीता शिंडे (बापल्योक), स्मिता तांबे (बीटर स्वीट कडुगोड),

प्रथम पदार्पण अभिनेता :- ऋतुराज वानखेडे ( जयंती), ओमप्रकाश शिंदे ( काळीमाती), वैभव काळे (काळोखाच्या पारंब्या )

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पायल जाधव ( बापल्योक ), पल्लवी पालकर ( फास ) रेशम श्रीवर्धन ( जून )

59 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत. –

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी), जयंत पवार ( भाऊ बळी ३६०० रुपयांचा सवाल ), सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं)

उत्कृष्ट पटकथा :- रसिका अगासे (तिचं शहर होणं), वैशाली नाईक (बाईपण भारी देवा), निखील महाजन, प्राजक्त देशमुख ( गोदावरी)

उत्कृष्ट संवाद :- रशिद उस्मान निंबाळकर (इरगाल), नितिन नंदन (बाल भारती), प्रकाश कुंटे (शक्तिमान)

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी (गोदावरी), वलय मुळगुद (बाई पण भारी देवा), संदिप खरे (एकदा काय झालं)

उत्कृष्ट संगीत: – अमित राज ( झिम्मा ), डॉ.रुद्र कर्पे ( कुलूप ) सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- पंकज पडघन (आणीबाणी) ए.व्ही.प्रफुलचंद्र (गोदावरी), सारंग कुलकर्णी (कारखानीसांची वारी),

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहूल देशपांडे (गोदावरी), शुभंकर कुलकर्णी (एकदा काय झालं), डॉ.भीम शिंदे (इरगाल)

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी (रंगिले फंटर), आर्या आंबेकर (कुलूप) सुवर्णा राठोड (बाईपण भारी देवा)

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर (लक डाऊन be positive), विठ्ठल पाटील (पांडू), सुभाष नकाशे (बाईपण भारी देवा)

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,) सुमित राघवन ( एकदा काय झालं ), संदीप पाठक ( राख )

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी (तिचं शहर होणं), मृण्मयी देशपांडे (बेभान), स्मिता तांबे (गौरीच्या लग्नाला यायचंहं )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू ), आनंद इंगळे ( लक डाऊन be positive ), सिद्धार्थ जाधव (लोच्या झाला रे)

सहाय्यक अभिनेता :- प्रियदर्शन जाधव ( शक्तीमान), मोहन आगाशे ( कारखानिसांची वारी ), अमेय वाघ ( फ्रेम )

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ), क्षीती जोग ( झिम्मा ), शीतल पाठक ( जननी )

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- रसिद निंबाळकर ( इरगाल ), महेश पाटील ( कुलूप ), योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )’

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमध्वनी), सृष्टी वंदना(कुलूप), सृष्टी जाधव(इरगाल)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- सुकन्या कुलकर्णी-मोने ( बाई पण भारी देवा ), निर्मिती सावंत ( झिम्मा ), शुभा खोटे ( लक डाऊन be positive )

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘इको बाप्पा मोबाईल ॲप’चे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

या व्यक्तींचा कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल, जाणून घ्या, गुरुवार, १५ ऑगस्टचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल, जाणून घ्या, गुरुवार, १५ ऑगस्टचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011