इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावर अनेक रिऍलिटी शो सुरू असतात. या शो मुळे तळागाळातला कलाकार मनोरंजन विश्वाला मिळाला, असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. गाण्यांच्या रिऍलिटी शोमधून नवनवीन होतकरू आणि गुणी गायक मिळाले, तर विनोदी कार्यक्रमांमधून विनोदी कलाकार मिळाले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा असाच एक कार्यक्रम. यातील गौरव मोरे आणि आता वनिता खरात देखील लोकप्रिय झाली आहे. नुकतेच तिने एका जाहिरातीचे काम स्वीकारून ती जाहिरात केली आहे. तिची ही जाहिरात प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरलेली दिसते. ही जाहिरात पाहून प्रेक्षकांना हसू अनावर होत असल्याचे दिसते.
अभिनेत्री वनिता खरातची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या जाहिरातीमध्ये वनिताने केलेलं काम लक्षवेधी ठरते आहे. एका कोल्ड ड्रिंकच्या ब्रँडसाठी तिने ही जाहिरात केली आहे. यातील तिचा हटके अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे. यातील वनिताचा लूकही विशेष लक्षवेधी आहे. मधुचंद्राला दुधाऐवजी वनिता घेऊन येत असलेली कोल्ड ड्रिंक आणि त्यानंतरचे तिने संवाद अशी जाहिरातीची ही भन्नाट कल्पना, वनिताचा अभिनय याचं नेटकरी कौतुक करत आहेत. ‘तुमच्या क्रिएटीव्हीटीला सलाम’, ‘वनिता खरात अगदी उत्तम, मस्त जाहिरात’, अशा कमेंट तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
Marathi Actress Vanita Kharat Video Viral
Entertainment