इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुंबईतील मनोरंजन सृष्टीचं कोणाला आकर्षण नसतं? सगळ्यांनाच त्याची भुरळ पडते, आणि देशभरातून अशा इच्छुकांचा ओघ मुंबईत येतच असतो. यातील अनेकांना विशेषतः मुलींना अनेक वाईट अनुभव येत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीत याचे प्रमाण जास्त असले तरी मराठी कलाकारांना देखील असे अनुभव कमी जास्त प्रमाणात येतच असतात. सगळेच काही त्याबद्दल उघडपणे बोलतात असे नाही. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मात्र याबद्दल उघडपणे सांगितले आहे.
तेजस्विनी आज एक प्रथितयश अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिलाही असा त्रास सहन करावा लागला होता. करिअरच्या सुरुवातीला पुण्यातील एका नगरसेवकाने तेजस्विनीला त्रास दिला होता.
सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने आपल्या सुरुवातीच्या काळात आलेल्या या अनुभवाबद्दल सांगितले. तेजस्विनी सांगते, “करिअरच्या सुरुवातीला म्हणजे २००९ – २०१० मध्ये तेजस्विनी पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. मी राहत असलेले घर एका नगरसेवकाच्या मालकीचे होते. मी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये भाडं देण्यासाठी गेले तेव्हा त्याने माझ्याकडे घाणेरडी मागणी केली”. ते ऐकताच त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास उचलून मी त्याच्याच चेहऱ्यावर फेकला. एवढंच नाही तर हेच करायचं असतं तर मी आज भाड्याच्या घरात राहिले नसते. उलट करिअरच्या सुरुवातीलाच माझं घर झालं असतं आणि दारात गाड्या देखील असत्या, असही नगरसेवकाला सुनावलं.
‘अगं बाई अरेच्चा’ या सिनेमातून तेजस्विनीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘मी सिंधुताई सपकाळ’,’तू ही रे’, ‘देवा’, ‘एक तारा’ अशा अनेक सिनेमांत काम केलं. ‘एकाच या जन्मी जणू’, ‘लज्जा’ या मालिकांमध्येदेखील तिची महत्त्वाची भूमिका होती. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीची ‘रानबाजार’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लवकरच ती ‘अथांग’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
नायिकांना मानधन कमी असूनही त्या प्रोड्युसर कशा होतात?
मराठीतल्या कंपुशाहीबद्दल काय वाटतं तिला?
काय होती ती मौल्यवान भेट जी आपल्या पहिल्या कमाईतून तिने आई – वडिलांना दिली?
असे अनेक प्रश्न आणि त्यातून उलगडत जाणारी तेजस्विनी..
हा पॉडकास्ट जरुर ऐका..#मित्रम्हणे pic.twitter.com/P4wKzfwFxM
— Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) December 11, 2022
Marathi Actress Tejaswini Pandit Pune Corporator Demand
Entertainment Film Movie TV