India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तेजश्री प्रधान पुन्हा बोहल्यावर? ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील कलाकार हे प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीचे असतात. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत त्यांना रस असतो. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी’ या मालिकेतील श्री – जान्हवीची जोडी घराघरात लोकप्रिय होती. यातील जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान हिचा एक मुंडावळ्या बांधलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे पुनःप्रक्षेपण सुरू झाले आहे. नेमकं तेव्हाच तेजश्रीने असा व्हिडीओ टाकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओवर तेजश्री ‘पुन्हा १२ वर्षांनी का होईना पण योग आलाच’ असंही लिहिलं आहे. मंदार देवस्थळी यांच्या ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमधून तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या जोडीला प्रेक्षकांचं अपरंपार प्रेम मिळालं. याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्री यांची प्रेम कहाणी फुलली. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ८ फेब्रुवारी २०१४ मध्ये शशांक- तेजश्रीने पुण्यात लग्न केलं मात्र अवघ्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. सध्या तेजश्री आपल्या लव्ह लाईफबद्दल मौन बाळगून आहे, तर शशांकने आपल्या आयुष्यात मूव्ह ऑन झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यासह दोन फोटो असणारा एक व्हिडीओ तेजश्रीने शेअर केला आहे. यात १२ वर्षांपूर्वीचा फोटो आणि १२ वर्षांनंतर पुन्हा त्यांच्यासह स्क्रीन शेअर करण्याचा योग आल्याचं तिने लिहिलं आहे. तेजश्री लिहिते की, “इतक्या वर्षांनी हा योग पुन्हा आला. मोहन काका, हे फिलिंग फारच भारी आहे. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात त्यातील काहीच शेवटपर्यंत राहतात. माझ्या पाठिशी कायम असल्याबद्दल तुमचे खूप आभार”, असे तेजश्रीने म्हटले आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या सिनेमात तेजश्रीने डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा मोहन आगाशे आणि तेजश्री स्क्रीन शेअर करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

Marathi Actress Tejashri Pradhan Wedding Video Viral


Previous Post

मिशन इयत्ता दहावी – परीक्षा हॉल मध्ये जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर काय करावं? (व्हिडिओ)

Next Post

मालेगावमध्ये चोरट्यांनी चक्क वनविभागाच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले

Next Post

मालेगावमध्ये चोरट्यांनी चक्क वनविभागाच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group