नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. गेल्या दोन वर्षांपूर्वी बेर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, दोन वर्षातच त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग केला आहे.
नाशिक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे नेत्यांनी स्वागत केले. आंतरराष्ट्रीय भरडधान्य (मिलेट) वर्षाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा खास मिलेट धान्य देऊन नाशिक नगरीच्या वतीने प्रदेश कार्यकारिणी बैठकीत स्वागत केले.
Marathi Actress Priya Berde Join BJP in Nashik