भोंगे व रुग्णवाहिकेच्या सायरनने नागरिकांत घबराट..
मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धावत्या रेल्वेचा अपघात झाल्यावर निर्माण झालेल्या अपातकालीन परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे यासाठी मनमाड रेल्वे स्थानकाजवळील लोकाशेड जवळ रेल्वेच्या भुसावळ विभाग व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमानाने मॅाकड्रिल करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा महिना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये प्रथम धावत्या रेल्वे गाडीचा अपघात झाल्याचे दाखविण्यात आले. या दुर्घटनेच्या वेळी रेल्वेच्या सर्व विभागाचे कर्मचारी तसेच एनडीआरएफने युद्धपातळीवर मदतकार्य राबवित परिस्थिती नियंत्रणात आल्याची थरारक उभेउभ प्रात्याक्षिके सादर केले. तसेच गाडीच्या डब्याला लागलेली आगही नियंत्रणात आणल्याचे प्रात्यक्षिके दाखविले. अचानक झालेले भोंगे व रुग्णवाहिकेच्या धावपळीमुळे काही काळ शहरात संभ्रम निर्माण झाला होता.