मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड येथून शिर्डीला जात असलेली टाटा मॅजिक गाडीला लागली आग लागल्याची घटना मनमाड-येवला रस्त्यावर अंनकाई पाटी जवळ घडली. गाडीतून धूर येत असल्याचे चालकाचे लक्षात येताच गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर प्रवाशी गाडीच्या खाली उतरले आणि गाडीने पेट घेतला. या घटनेत मात्र प्रवाशांचे समान आणि गाडी जळून खाक झाली. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेत सुदैवाने सर्व प्रवाशी सुरक्षित आहे. ही गाडी मनमाड रेल्वे स्थानकातून शिर्डीला घेऊन टाटा मॅजिक जात होती..