इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा इम्फाळ येथील राजभवनात सुपूर्द केला. गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाराच्या आगीत होळपणा-या मणिपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. या निर्णयापूर्वी एन बिरेन सिंग यांनी आज दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.
मणिपूर विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून १० फेब्रुवारी पासून सुरु होणार होते. या अधिवेशनात विरोधक मणिपूर सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते. पण, त्यापूर्वीच एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही वेळानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात पक्षप्रमुखांची बोलून नवा नेता निवडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.