सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथील प्रसिध्द म्हसोबा मंदिरात दोन महिन्यांपूर्वी चोरट्यानी दानपेटी फोडून त्यातील मोठी रक्कम चोरली. त्याचबरोबर जाताना मंदिरातील सीसीटीव्हीचा डिसिआर चोरून नेला होता. येवला तालुका पोलीस या चोरीचा तपास करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्यात एका लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला विश्वासात घेत पोलिसांनी या चोरी प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. हे सगळे आरोपी याच परिसरात राहणारे आहे.