इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका व्यक्तीने झाडी, डोंगर आणि समुद्राच्या सान्निध्यात राहण्यासाठी चक्क अत्यंत मोठ्या पगाराची नोकरीचा राजीनामा दिला, हे कुणाला खरे वाटणार नाही. लंडनमध्ये मुख्यालय असणाऱ्या ज्युपिटर फंड मॅनेजमेंट या खासगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅण्ड्रू फॉर्मिका यांनी अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. फॉर्मिका यांनी ६८ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकं म्हणजेच पाच लाख ३७ हजार कोटी रुपये मूल्य असणाऱ्या या कंपनीमध्ये फॉर्मिका हे २०१९ साली रुजू झाले होते. ते एक ऑक्टोबर रोजी आपलं पद सोडणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिले आहे.
सध्या कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असणारे मॅथ्यू बेस्ली हे या फॉर्मिका यांची जागा घेतील. याशिवाय फॉर्मिका हे या कंपनीच्या निर्देशक पदावरुनही राजीनामा देणार आहे. फॉर्मिका यांनी खासगी कारणामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यांना आपल्या मूळ देशात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या वयस्कर आई-वडिलांसोबत वेळ घालवायचा आहे, असे कारण त्यांनी कंपनीला दिल्याचं समजते.
“मला फक्त समुद्रकिनारी बसून रहायचे आहे, एकदम निवांत काहीच काम न करता,” असे आपल्या भविष्यातील नियोजनासंदर्भात बोलताना फॉर्मिका यांनी ब्लूमबर्गला सांगितले. म्हणजेच आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर बसून केवळ झाडी, डोंगर आणि समुद्र पाहत निवांत वेळ घालयावचाय असं फॉर्मिका यांनी सूचित केले आहे.
फॉर्मिका हे मागील तीन दशकांपासून इंग्लडमध्ये आहेत. २०१९ पासून ते ज्युपिटरमध्ये असले तरी त्यापूर्वी त्यांनी जऍनस हेंडरसन ग्रुपमध्ये काम केलं आहे. त्यांनी अमेरिकेतील जॅनस आणि युकेमधील हेंडरसन समुहाच्या विलनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. फॉर्मिका यांना गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव आहे.
Man Left job of CEO of 5 lakh thousand crore company