मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील राष्ट्र सेवा दल मालेगाव व्दारा दीपावलीपर्वा निमित्ताने पुस्तक भेट व प्रदूषण मुक्त दीपावली उपक्रमा अंतर्गत आश्रय अनाथ आश्रम व पुनर्वसन केंद्र भायगाव रोड मालेगाव कॅम्प तसेच शासकीय बाल सुधार गृह मोची कॉर्नर आणि हॅपी होम कॉलनी, सिद्धेश्वर नगर अशा तीन ठिकाणी मुलांना साधना बालकुमार भेट देण्यात आले. यावेळी प्रदूषण मुक्त दीपावलीचा संदेश देण्यात आला. राष्ट्र सेवा दल जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर तसेच साथी रविराज सोनार यांनी मुलांशी संवाद साधला. तसेच मुलांना चॉकलेट ही देण्यात आले. या अंका साठी पार्ले (मुंबई) येथील साथी प्रशांत देशपांडे यांनी सहयोग दिला होता तर चॉकलेट संध्या अनिल कोलगे, पुणे यांचे तर्फे देण्यात आले. यावेळी तालुका संघटक सारंग पाठक, बाल सेवा दल सैनिक दीपराज सारंग पाठक, जेष्ठ सेवा दल सैनिक विलास वडगे, बळवंत आहिरे, राजीव वडगे, आश्रय पुनर्वसन केंद्र संस्थापक श्यामकांत पाटील तसेच शासकीय बाल सुधार गृह व्यवस्थापक उपस्थित होते.