मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती- पत्नीच्या कौटुंबिक वादातून मालेगावमधील सर्व्हे नंबर ५५ च्या निहाल नगर भागात शालकाणे मेव्हण्यावर कटरने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मेव्हणा सरताज सत्तार शेख या हल्ल्यात जखमी झाला असून, त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हल्लेखोराने जमाव पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा आरोप जखमी सरताज व परिसरातील नागरिकांनी केला आहे. हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान गोळीबार झाला की नाही याचा पोलीस तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चौकशी अंती तसा गुन्हा दाखल केला जाईल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.