मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सरदार चौकातील भर गजबजलेल्या रस्त्यावर चक्क एका माथेफिरुने हातात सुरा घेऊन दहशत निर्माण केली. या माथेफिरूने सुरा हवेत फिरवत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या घटनेची माहिती जवळच असलेल्या किल्ला पोलिसांना मिळताच, दोघे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या माथेफिरुच्या हातातून सुरा घेत त्याला ताब्यात घेतले.