अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातून वाहणा-या मोसम नदीला मोठा पूर आल्याने मालेगाव शहरातील श्रीरामनगर-द्याने या रस्त्यावरील फरशी पुलावरून पाणी वाहत असताना या फारशी पुलावरील रस्त्यावरुन दुचाकीवरुन दोघे जात होते अचानक दुचाकी चालविणा-याचा तोल गेल्याने ते खाली पडले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना काल घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर मालेगाव अग्निशामक पथकातील पट्टीच्या पोहणा-यांनी शोध कार्य सुरु केले मात्र दोघा तरुणांचा मात्र कुठलाही ठावठिकाणा लागू शकला नाही आज सकाळी पासून पुन्हा त्यांचा शोध घेतला जात असताना दुपार नंतर मोसम पुलाजवळील एका ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला असून सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टेम साठी पाठवण्यात आला असून दुसऱ्याचे शोध कार्य सुरू आहे.