मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव जवळ मुंबई -इंदौर महामार्गांवर कंटेनर -कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार पूर्णपणे दाबली गेली. या अपघातात कार मधील दोन जण जखमी झाले आहे. एयर बॅगमुळे त्यांचे प्राण वाचले.
सोनगाव फाट्याजवळ हा कंटेनर आणि कारचा हा अपघात झाला. त्यात कार पूर्णपणे कंटेनरच्या खाली दाबून तिचा चक्कचूर झाला आहे. अपघातात कार मधील दोघे जण जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार ज्या पद्धतीने कंटेनर खाली दाबली गेली ते पाहून त्यातील कोणीच वाचला नसेल असे वाटले होते. मात्र कार मधील एयर बॅगमुळे दोघांचा जीव वाचला असून अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले.