नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुःखद बातमी आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट नेमका कुठल्या विभागात आणि कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा स्फोट बॉयलरचा असल्याचे सांगितले जाते. स्फोटानंतर कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. आग आणि प्रचंड धुराचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत. जिल्ह्यातील सर्व अग्निशमन बंब आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तसेच, परिस्थितीचे गांभिर्य पाहून कंपनीच्या परिघातील ३ किमीचा परिसर निर्मनुष्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कंपनीमध्ये एक हजाराहून अधिक कामगार काम करतात. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोठा स्फोट कंपनीत झाला. स्फोटानंतर भीषण अग्नीतांडव सुरू झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिस आणि अग्निशमन यंत्रणेला फोन गेल्यानंतर अनेक अग्निशमन बंब आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासह आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, आग आणि धुराची स्थिती पाहता बराच वेळ नियंत्रण मिळविण्यात जाणार असल्याचे दिसून येते.
कंपनीतील आगीची भीषणता अतिशय मोठी आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व अग्निशमन बंब आणि अॅम्ब्युलन्स कंपनीच्या आवारात मागविण्यात आले आहेत. तसेच, कंपनीच्या परिसरातील तब्बल ३ किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्याचे कामही प्रशासनाने हाती घेतले आहे.जिल्हाधिकारी गंगाधरन, पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पाहणी दौरा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतिशय युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू आहे. मात्र, त्यास फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे.
– इगतपुरीतील जिंदाल कंपनीत मोठा स्फोट..
– स्फोटांमुळे आजूबाजूच्या गावांना हादरा ..
– स्फोटात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती..#Igatpuri #blast pic.twitter.com/q0HzErkv50— poonamkawar19 (@poonamkawar19) January 1, 2023
Major Blast and Fire in Jindal Company Today
Igatpuri Vadivarhe Smog Industry